शाहिद बाबा शेख / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता

सिन्नर-शिर्डी महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. पाथरे गावानजीक हॉटेल वनराई जवळ खासगी आराम बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे. अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशा चुराडा झाला आहे अंबरनाथ ठाणे येथून शिर्डीकडे जाणारी खासगी आराम बस क्रमांक एम. एच. ०४ एस. के. 2751 व शिर्डी कडून सिन्नर बाजूकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच 48 टी 1295 यांची समोरासमोर धडक झाली.बसमध्ये अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डी कडे प्रवास करत होते.उल्हासनगर येथून साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला आहे.या अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे तर 12 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते.

साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

