सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

नाताळचा पवित्र सण जगभर आनंदाने साजरा होत असताना दिव्यांग बालकांना याचा आनंद घेता यावा यासाठी दि. २३ डिसेंबर २०२२ रोजी विकास मंदिर शाळेचे प्रांगणात दिव्यांग बालकांसमवेत नाताळ सणांचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी बालकांनी विविध गुणदर्शनाचे सादरीकरण करून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. श्रीमती क्रिस्टिना डिसूझा आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की, “या दिव्यांग बालकांचे कार्यक्रम पाहून माझे मन हेलावून गेले माझे शब्दच अबोल झाले.”
यावेळी नाताळचे गिफ्ट्स देण्याकरिता अनेक मान्यवर उपस्थित होते. घेण्यापेक्षा दुसऱ्याला देण्यात अधिक आनंद आहे. इतरांवर प्रेम करा ही येशू ख्रिस्ताची शिकवण प्रत्यक्षात अनुभवयास मिळाली. एम्पाॅवर शाळेचे प्राचार्य श्री जाॅयसन यांचे हस्ते गिफ्ट्स वाटण्यात आल्या.
श्रीमती प्रीति मल आणि त्यांच्या ग्रुप च्या ३० मुलींनी बालकांना चाॅकलेट्स व रंगीत टोप्यांचे वाटप केले. पास्टर रुपेश धीवर त्यांनी ९ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. श्री निगम परिवाराने मुलांना ब्लॅंकेट्स वाटलेत. याच वेळी सौ मारुख मिस्त्री यांचा वाढदिवस साजरा करून केक व वेफर्स चा खाऊ देण्यात आला.
या शुभप्रसंगी उज्वला बैसाने , आनंद त्रिभुवन, निगम परिवार आणि बहू संख्येने पालक उपस्थित होते. सूत्र संचालन सोनवणे सर यांनी केले तर आभार सौ.घोडके यांनी व्यक्त केले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

