सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

नाशिक-पुणे महामार्गावर पळसे गावाच्या नजीक एस टी महामंडळच्या बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. मागून येणाऱ्या बस ने जोरदार धडक दिल्या ने अपघात झाला. पळसे गावाच्या फाट्यावर अत्यंत धोकादायक चौफुली असल्याने त्याठिकाणी मोठा गतिरोधक आहे. अपघात झाला. त्यावेळी गतिरोधकाजवळ तीन दुचाकीही होत्या. दुचाकीस्वारही या अपघाताचे शिकार झाले आहेत.

एसटी महामंडळाच्या दोन बस पुण्या कडून नाशिकच्या दिशेने जात असताना पळसे गावानजीक चौफुलीवर गतिरोधकाजवळ मागून येणाऱ्या एसटीने क्र एम एच 07 सि 7081 चालकाला बस नियंत्रित करता आली नाही त्या ने पुढील बस क्र एम एच 14 बी टी 3635 या बस ला धडक दिली यातून मोठा अपघात होऊन मागून येणाऱ्या दोन्हीही बस धडकून अपघात झाला. याचवेळी गतिरोधकावर संथ गतीने जाणारे दोन ते तीन दुचाकीस्वारही या अपघातांचे शिकार झाले.

दरम्यान, या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर काही जण गंभीर जखमी झालेले आहेत. अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर एसटी बसने पेट घेतला. बसने पेट घेतला त्यावेळी अनेक प्रवासी बस मध्येच होते. त्यातील काही जखमी अवस्थेत होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत सर्व प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले. तसेच जखमींना रूग्णालयात दाखल करण्यासाठी रवाना केले आहे.

साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 98221 17037 / 98228 17037

