सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नरच्या मोहदरी घाटात झालेल्या भीषण अपघातात पाच महाविद्यायालीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. सिन्नर तालुक्यातील मोहदरी घाटात तीन कारमध्ये हा अपघात झाला असून त्यात ५ विद्यार्थी जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात ३ मुली व २ मुलांचा समावेश आहे.
कारचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाला. पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ हा अपघात झाला आहे.

संगमेनरकडून नाशिककडे स्विफ्ट डिझायर कार येत होती. मात्र, या कारचे टायर अचानक फुटलं. त्यावेळी कार भरधाव वेगात होती. त्यामुळेच ही कार अनियंत्रित झाली. परिणामी, डिव्हायडर तोडून ही कार थेट पलिकडच्या रस्त्यावर गेली. यावेळी कारने समोरुन येणाऱ्या दोन वाहनांना जोरदार धडक दिली.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 98221 17037 / 98228 17037

