रमिन काद्री – विभागीय संपादक – दक्ष पोलीस वार्ता , येवला

बाभूळगाव येथील संतोष श्रमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी येथील शिक्षक श्री प्रदीप पाटील सर यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया, संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जनजागृती होण्यासाठी याप्रसंगी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांनी घटनेचे प्रास्ताविक सामूहिक रित्या वाचले.

26/11 च्या दुर्दैवी घटनेतील शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री येवले सर, उपप्राचार्य कदम सर, माध्यमिक विभाग प्रमुख श्री परदेशी सर, खोकले सर, पाटील सर, आव्हाड सर, गायकवाड सर, पिंगट सर आणि इतर शिक्षक वृंद तसेच ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री पैठणकर सर, खैरे सर, किरण गायकवाड सर, जाधव एन.बी सर, गोल्हाईत सर, समाधान गायकवाड सर, अनर्थे सर, देठे सर, मोहन सर, जाधव ए.डी सर, देवढे सर, काद्री सर, बाकळे सर, अरोरा सर, शाह सर, भड सर, संसारे मॅडम, जाधव मॅडम, बोजगे मॅडम, फारुकी मॅडम आदी शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 98221 17037 / 98228 17037

