सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

नाशिकमधील त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आलोक विशाल शिंगारे (वय ४) रा. उल्हासनगर असे मुलाचे नाव आहे.
नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या तुपादेवी गावाजवळ अंजनेरी येथे हे आश्रम आहे. या आश्रमात मध्यरात्री चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यार्थ्यांने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली आहे, त्याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर दाखल करण्यात आले आहेत. हत्या की आत्महत्या याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेची गंभीर दखल गृह विभागाने घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 98228 17037 / 98221 17037

