पत्नी व सात वर्षे मुलाची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न नाशिक रोड परिसरातील जेल रोड लगतच्या महारुद्र कॉलनी वसंत विहार आर इंगळे चाळ येथे सोमवारी सकाळी घडलेल्या धक्कादायघटनेत पतीने पत्नी आणि सात वर्षे मुलाची धारदार शस्त्राने हत्या केल्यानंतर स्वतः विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे आणि खळबळ उडाली आहे या घटनेत अश्विनी किरण हजारे मैत्री ४३ आणि श्रेयस किरण हजारे वय ७ याचा जागीच मृत्यू झाला तर किरण एकनाथ हजारे वय ५४ याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला प्रथम बिटको रुग्णालयात त्यानंतर शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे प्राथमिक तपासात अश्विनी हजारे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आल्याचे तर सात वर्षे श्रेयसच्या गल्यावर वार झाल्याचे आढळून आले अति रक्तस्त्रावामुळे दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शने स्पष्ट झाले माहितीनुसार किरण आणि अश्विनी हजारे यांचा २०१७ मध्ये विवाह रद्द झाला होता दोघांचेही हे दुसरे लग्न होते किरण हजारे हा रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा तसेच सोलर प्लांट उभारण्याचा व्यवसाय करत होता नाशिक रोड पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व बाजूंनी तपास करत आहेत आरोपीची प्रकृती सुधारल्या नंतर त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणाच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे प्रवीण सूर्यवंशी तसेच पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते प्रतिनिधी शाहीद बाबा शेख नासिक
