राजेंद्र कोल्हे/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,चांदवड

RBI ने कालच म्हणजेच दि. १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर सर्वसामान्य जनतेत काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते कारण आजवर त्यांनी कष्टाने जमवलेल्या नोटा जर चलनातून बाद करण्यात आल्या तर हाती काहीच उरणार नाही. ज्यांचे बँक खाते आहे त्यांना २००० रुपयांच्या नोटा बँकेतून बदलण्याचा पर्याय उपलब्ध आहे पण ज्यांनी अजून बँकेची पायरीही चढली नाही पण कमावलेल्या पैश्यांची घरच्या घरीच बचत केली आहे, अश्या लोकांमध्ये सध्या संभ्रमाची स्थिती उपस्थित झाली आहे. हा लेख त्यांना योग्य ते मार्गदर्शन करेल यांत शंका नाही.!
नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या २००० रुपयांच्या नोटा टप्प्या – टप्प्याने बंद केल्या जात आहेत. २०१६ च्या नोटाबंदीप्रमाणे ते ताबडतोब चलनातून बाहेर काढले गेले नसले तरी बँकांमध्ये त्यांचे वितरण थांबवण्यात आले आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

