सिन्नर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी इलेक्ट्रिक लाईन वरील ॲल्युमिनियम च्या तारांची चोरी करणारे केले गजाआड एकूण १०. ७७ ६००/रु किमतीचा मुद्देमाल जप्त
. प्रतिनिधी सुरेश सांगळे सिन्नर सिन्नर शहरात दि १३/३/२०२६ रोजी रात्री ०२/०० च्या सुमारास सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.हेमंत कुमार भामरे यांना गोपनीय खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की काही इसम पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक एम एच १५ के एच ००९८ हिचेत निफाड च्या बाजूकडून सिन्नरच्या बाजूकडे काहीतरी संशयस्पाद वस्तू घेऊन जात आहे त्यात चोरीचा माल असल्याची शक्यता आहे अशी बातमी मिळाल्यानंतर श्री हेमंत कुमार भामरे यांनी सिन्नर पोलीस ठाणे कडील गुन्हे पथकातील अंमलदार पो हवा बोराडे पो हवा नितीन डावखर पो शि कोकाटे पो शि काकड पो शि शहाणे अशांना खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश केल्याने नमूद पथकातील अंमलदार यांनी तात्काळ संगमनेर नाका येथे नाकाबंदी करून सदर वाहन आल्याचे दिसल्याने वाहनाकडून त्यांचे वाहन थांबवून त्यांचे चालकाला नाव गाव विचारतात त्याने त्याचे नाव(१) मकसूद कल्लू शेख वय ३२ वर्ष ह. रा.गोपाल कृष्ण लॉन्स त्रिमूर्ती हॉटेलच्या जवळ सुभाष शेळके यांच्या जागी नांदूर शिंगोटे ता. सिन्नर जि.नाशिक मुक्काम पोस्ट राहणार मोहोर शौहरतगड ता.नवगड जी सिद्धाथनगर उत्तर प्रदेश तसेच त्याच्या सोबती असलेला साथीदार त्यांना त्यांची नावे विचारता (२)आसिफ जुम्मन शेख वय (१९) वर्षे ह रा गोपाल कृष्ण लॉन्स त्रिमूर्ती हॉटेल जवळ सुभाष शेळके यांच्या जागी नांदूर शिंगोटे ता.सिन्नर जि.नाशिक फहीम अहमद अन्सारी वय (३८). रा.वॉर्ड नं. १ मनात खरजम्मा जि.वैशाली राज्य बिहार असल्याचे विचारपूस केली असाता त्यांचे उडवा उडवी चे उत्तर मिळाल्याने इसम व पिकअप गाडीची झडती घेतली असता त्यात अल्युमिनियम चे बंडल मिळून आल्याने त्याबाबत चौकशी केली असता उडवा उडवी चे उत्तर मिळाल्याने त्यांना व पिकअप गाडी सिन्नर पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्यानंतर वरील इसमाकडे मिळून आलेल्या तारांची मालकी हक्काबाबत कोणताही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलीस ठाणे पोलीस शिपाई अण्णासाहेब पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नंबर १८६ / 2026 महाराष्ट्र पो.अधि.१९५१ कलम १२४ प्रमाणे गुन्हा नोंदवून मिळून आलेले एकूण मुद्दमाल १०.७७. ६९९/ रु किमतीचा मुद्देमाल महिंद्रा पिकअप गाडी जप्त करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपी नामे मकसूद कल्लू शेख यांनी सांगितले मकसूद व मी फहीम अहमदअन्सारी असे आम्ही सुमारे ०८/१० महिन्यापूर्वी पास्ते शिवारात अल्युमिनियमच्या तारांची चोरी केले असल्याची कबुली दिली सदर या बाबत पास्ते शिवारातून अल्युमिनियमच्या तारांची चोरी गेल्या बाबत पोलीस ठाणे गु र नं ३३५/ २०२५ बी एन एस ३०३/२ प्रमाणे दि२९/०५/२०२५ रोजी गुन्हा दाखल असल्याने आरोपी मकसूद कल्लू शेख व फहीम शेख यांना नमूद गुन्ह्यांत अटक करून मा. न्यायालयीन हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना ०३/ दिवसाची पोलीस कस्टडी रीमाड दिलेली आहे तसेच आरोपीकडे आणखी काही ठिकाणी चोरी केलेली आहे याबाबत चौकशी सिन्नर पो स्टेशन करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कांतीलाल पाटील निफाड विभागीय निफाड यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री हेमंत कुमार भामरे सिन्नर पोलीस ठाणे श्री पोलीस ठाणे यांनी दिलेल्या आदेशान्वय सिन्नर शोध पथकाचे पो हवा समाधान बोराडे नितीन डावखर पो सी नितीन टिळे पो शि कृष्णा कोकाटे अण्णासाहेब काकड प्रशांत शहाणे यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे सिन्नर पोलीस स्टेशन कडील गुन्ह्याचा पुढील तपास पो हवा सुहास गोसावी व पो हवा बोराडे हे करीत आहे
