मालेगाव बनावट नोटा छापणारा मुख्य आरोपी छत्रपती संभाजी नगरातून अटक
प्रतिनिधी शाहीद शेख मालेगाव मालेगाव दि. २३/१/२६ रोजी सकाळी ११/ ते ११/३० चे सुमारास एचडीएफसी बॅंक सटाणा नाका मालेगाव येथे इसम नामे गणेश कैलास खरे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स कलेक्शन एजंट यांनी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्सखाते क्रमांक या मध्ये भरणा करणे कामी जमा केलेले एकूण रक्कम ८९ हजार पैकी ५० हजार रुपये च्या ५००च्या भारतीय चलनातील १०० नोटा या बनावट असल्याचे निदर्शनात आल्याने एचडीएफसी बॅंकेतर्फे फिर्यादी मोहन बाबुराव मुसळे असिस्टंट मॅनेजर एचडीएफसी बॅंक शाखा सटाणा रोड मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजी. नं २३/२०२६भारतीय न्याय संहिता कलम १७९. १८०प्रमाणे दाखल करण्यात आले गुन्हयाचा तपास श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री तेगबीर सिंह संधू अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस तपासा दरम्यान गणेश खरे कडे केलेल्या चौकशीत त्याच्याकडे आलेले ७९ हजार रुपये हे इसम नामे अजय राठोड याने रायबान मोरे रा. जातेगाव ता.नांदगाव याचा ट्रॅक्टरचा सहामाही हप्ता जमा करण्यासाठी दिले होते यानुसार अजय राठोड रा.जातेगाव नांदगाव यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यास सदरचे पैसे करण राठोड रा. जातेगाव नांदगाव याने दिले असल्याचे समजते करण राठोड पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली अशी समजली की करण राठोड यास बनावट नोटा या बन्सीलाल यादव रा. कन्नड याने पुरवले आहेत एकूण १ लाख १३ हजार रुपये बनावटी ५००च्या नोटा भरण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स चेक कलेक्शन एजंट यास दिले आहेत प्राप्त माहितीनुसार पोलीस पथकाने बन्सीलाल यादव यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता बन्सीलाल यादव यादव यास बनावट नोटा रेहान खान रा.कन्नड यांचा मित्र समीर शेख रा. कन्नड यांनी पुरवले असल्याचे निष्पन्नझाले पुढील तपास केला असता समीर शेख याच बनावटी नोटा गोल्डन कुरेशी रा. संभाजीनगर याने पुरवल्या तसेच गोल्डन कुरेसी यास बनावट नोटा अजिंक्य जाधव याने पुरवल्या अजिंक्य जाधव यास बनावट नोटा शुभम थोरात रा. संभाजीनगर पोलिसांनी पुढील चौकशी करून नमूद गुन्ह्यात बनावट नोटा तयार करणारा मुख्य सूत्रधार संतोष उत्तमराव केळसकर व्यवसाय ग्राफिक डिझायनर रा. जय भवानी नगर छत्रपती संभाजीनगर यास सापळा लावून शिताफिने ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एकूण २०० बनावट ५०० रुपये दराच्या नोटा जप्त करण्यात आल्या तसेच त्याचे विनायक ग्राफिक्स नावाच्या दुकानातून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी एकूण १ लाख ३६ हजार ७०० रुपयांची साधन समुग्री त्यामध्ये संगणक प्रिंन्टर ८५ GCM पेपर स्क्रीन प्रिंन्ट पेनड्राईव्ह मोबाईल फोन प्रिंट इंक स्केल कटर इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे पोलिसांनी तपासात एकूण ३८५बनावट ५००दरच्या च्या नोटा जमा करण्यात आलेल्या आहेत छावणी पोलीस ठाणे दाखल गुन्हयाचा तपास श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री तेगबीर सिंह संधू अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली श्री दर्शन दुगड भापोसे सहा. पोलीस अधिक्षक कॅम्प उपविभाग हे करत असून पोलिसांनी बनावट चालनी नोटा तयार करणारे बाहेर जिल्ह्यातील रॅकेट उघडकीस आणले आहे तपासअधिकारी पथक (१)श्री दर्शन दुगड भापोशे सहा. पोलीस अधीक्षक कॅम्प उपविभाग (२) सपो नि श्री योगेश पाटील (३) पो हवा. १९७३ / गांगुर्डे (४) पोशि ६७२/सय्यद (५) पो ४८७ नितीन अहिरे (६) पो२९६ वैभव आहेर (७) पोशि २७२ सलमान खाटीक (८)पोशि २८५१ गोरख ठोंबरे सर्व नामे छावणी पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण
