दिनेश गोसावी/संपादक-दक्ष पोलीस वार्ता

उद्या होणाऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधुन चापडगाव ग्रामपंचायतीच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळगाव बाजार समितीचे संचालक चिंतामण दादा सोनवणे होते. यावेळी व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून जि.प सदस्य सिद्धार्थ वनारसे, सुरेश कमानकर, गोकुळभाऊ गिते, दिगंबर गिते, राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके पाटील, डॉ नरेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक पप्पू काद्री, शिवव्याख्याते सुदाम खालकर, सरपंच पूजा बबन दराडे, सोसायटी चेअरमन नीलेश दराडे, संदीप दराडे आदि मान्यवर उपस्थित होते.
चापडगांव येथील भुमिपुत्र, ज्यांनी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात आपले योगदान दिले, आपल्या सेवाभावी वृत्तीने शिक्षण क्षेत्रात नि:स्वार्थी पणे काम केलेल्या ३४ आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचा यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्त सर्वांना सन्मानचिन्ह, शाल, गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविन्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबनराव दराडे यांनी तर सूत्रसंचालन रमेश आव्हाड यांनी केले. आभार अतुल दराडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चापड़गाव ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

