रमिन कादरी/विभागीय संपादक-दक्ष पोलीस वार्ता,येवला

येवला तालुक्यातील भाटगाव रायते नदीवरील बंधाऱ्यात मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. दिपक दिलीप मिटके वय 18 राहणार भाटगाव ता. येवला आणि तुषार देविदास उगले वय 20 राहणार मांडवड वाडी ता. नांदगाव असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहे. दरम्यान तुषार उगले हा सुट्टी असल्याने नातेवाईकांच्या घरी आला होता, दोघेही घराजवळील नदीवरील बंधाऱ्यात पोहण्यास गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती कळताच येवला तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पोहणाऱ्या तुरूनांच्या साह्याने मृतदेह बाहेर काढले. यानंतर मृतदेह पुढील तपासासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
दोघेही तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. गणपतीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने परिसरात अत्यंत हळहळ व्यक्त होत आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822117037 / +919822817037

