लोकसहभागातून जलसंवर्धनाला बळ•सारसून पैकी दादर कोपरा येथे दोन वनराई बंधार्यांचे
पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवण्यासाठी ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने पुढाकार, श्रमदानातून जलसंवर्धनाच्या संदेश.
प्रतिनिधी, सुनील खुताडे.जव्हार जव्हार तालुक्यातील सारसुन ग्रामपंचायत पैकी दादर कोपरा हद्दीतील लोकसहभागातून दोन वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. पावसाळ्यामध्ये पडलेल्या पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याच्या उपयोग स्थानिक जलस्रोतांच्या संवर्धनासाठी व्हावा, तसेच परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेल्या या कामामुळे लोक सहभागातून जलसंवर्धनाची कामे प्रभावीपणे करता येतात, हा संदेश परिसरात पोहोचवला आहे. ग्रामीण भागात पावसाळ्या त मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. हे पाणी योग्य ठिकाणी अडवून जमिनीत मुरल्यास भूजल पातळी वाढवण्यास मदत होऊ शकते. वनराई बंधारे बांधल्यामुळे पाण्याच्या प्रवाह नियंत्रण करण्यास, पाण्याची साठवण करण्यास आणि स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन करण्यास हातभार लागतो. त्यामुळे उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अशा जलसंधारणाचे उपक्रम महत्वपूर्ण ठरतात. दादर कोपरा येथे वनराई बंधारे उभारण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुढाकार घेतला. गावाच्या विकासासाठी लोकसहभाग किती महत्त्वाचा आहे. हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. गावातील नैसर्गिक संसाधनाचे जतन करणे, पाण्याच्या अपव्यय रोखणे आणि भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये जल संवर्धनाबाबत जन जागरूकता निर्माण होण्यासही मदत होते. या उपक्रमावेळी ग्रामपंचायत सारसुन ग्रामविकास अधिकारी, माननीय प्रदीप पाटील साहेब.ग्रा.सा. सरपंच काकडी ताई जंगली, उपसरपंच सोनू डंबाळी साहेब. सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.नवशु जंगली साहेब. सदस्य श्री. विष्णू खुताडे. यांच्यासह दादर कोपरा येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. लोकसहभागातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गावातील जलसंधारणाच्या प्रयत्नांना बळ मिळाले असून. परिसरात पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेला चालना मिळाली आहे.
