मालेगाव महानगरपालिका आयुक्त.रवींद्र जाधव यांच्यासह तिघांवर लाच मागितल्या प्रकरणी लाच प्रतिबंधक पाथकाची कार्यवाही प्रतिनिधी शाहीद शेख मालेगाव
मालेगाव महानगरपालिकेतील दोन कामांच्या बिलांची रक्कम ठेकेदारांच्या बँक खात्यावर जमा करण्याच्या मोबदल्यात 80 हजार रुपयांची लाच मागितल्याचे आरोपावरून महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह सहाय्यक निलेश पाटील आणि अकाउंटन हरीश डिंबर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाआहे नाशिकच्या लाच प्रतिबंधक विभागाने गुरुवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी ही कारवाई केली असून तिन्ही संबंधितांना ताब्यात घेण्यात आले प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार मूळ तक्रारदाराने ९ जुलै रोजी या संदर्भात तक्रार दिली होती तक्रारदाराला अधिकार पत्र दिलेल्या दोन ठेकेदारांच्या महानगरपालिकेतील कामांच्या बिलांची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर आरटीजीएस द्वारे जमा करण्याच्या मोबदल्यात दोन्ही बिलांच्या प्रत्येकी चार टक्के प्रमाणे ७९ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे या प्रकरणात आयुक्तांचे सहाय्यक निलेश पाटील यांनी १० आणि १३ जुलै रोजी बिलांचे मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे तसेच आयुक्त रवींद्र जाधव यांनी २४ जुलै रोजी लाचेची मागणी केल्याचे आरोप आहे बिलांची रक्कम ठेकेदारांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर लाजेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविले असेही एसीबीच्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले अकाउंटंट हरीश डिंबर यांनीही लाखेच्या मागणी प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे याप्रकरणी मालेगाव किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधी नियम १९८८ चे कलम ७ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रत्यक्षात लाचेची कोणतेही रक्कम स्वीकारलेली किंवा हस्तगत केलेली नसल्याचे प्रसिद्धी पत्रकार स्पष्ट करण्यात आले ही कारवाई पोलीस उपाधीक्षक स्वाती पवार यांचा नेतृत्वाखाली पोलीस हवालदार शरद हेंबाडे पोलीस हवालदार युवराज खांडवी चालक पोलीस हवालदार विनोद पवार सर्व नेमणूक लाच प्रतिबंधक विभाग नाशिक सह सापला अधिकारी श्री स्वप्निल राजपूत पोलीस निरीक्षक लाच प्रतिबंधक विभाग नाशिक परिमंडळ नाशिक सह सापला पथक पोलीस हवालदार संदीप हांडगे पोलीस शिपाई किरण धुळे नेम लाच प्रतिबंधक विभाग नाशिक तपास अधिकारी श्री सचिन साळुंखे पोलीस उपाधीक्षक प्रतिबंधक विभाग धुळे यांच्या पथकाने केली पोलीस अधीक्षक भारत तांगडे अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मेरडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कविता फडतारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे
