२०२६ च्या जनगणनेतील फॉर्ममध्ये इस्लाम धर्माचा एकत्रित उल्लेख करणे बाबत नासिक मा जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले
जनगणना २०२६ च्या जनगणनेच्या फॉर्ममध्ये इस्लाम धर्माचा एकत्रित उल्लेख करणे बाबत
महोदय आपणास आमच्या संघटनेमार्फत नम्रपणे निवेदन करीत आहोत की २०११ च्या जनगणने मध्ये जो फॉर्म तयार करण्यात आला होता त्यामध्ये इस्लाम धर्माला मानणाऱ्या जातींना वेगवेगळ्या उल्लेखित करून त्यांची जनगणना करण्यात आली होती त्यामुळे इस्लाम धर्माला मानणाऱ्या लोकांची एकत्रितपणे जनगणना होऊ शकली नाही म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने २०१४ साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे जनहित याचिका क्रमांक १०/२०१४ अजिज अब्बास पठाण विरुद्ध भारत सरकार व इतर याचिकेमध्ये धर्माच्या बाबत जनगणनेमध्ये उल्लेख करण्याचे मागणी करण्यात आलेली आहे याबाबतचा निकाल न्यायालयाने राखीव ठेवलेला आहे या गोष्टीचा सुद्धा शासनाने दखल घेणे गरजेचे आहे खऱ्या अर्थाने मोहम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्माची स्थापना केलेली आहे परंतु काही गैरसमजातून कुठे मुस्लिम धर्म सुंनी मुस्लिम धर्म शिया धर्म असा उल्लेख आढळून येतो इस्लाम धर्माला मानणाऱ्या भारत देशात अनेक जाती आहेत उदाहरणार्थ मुस्लिम सुन्नी मुस्लिम सिया मुस्लिम बोरा मुस्लिम खोजा मुस्लिम ओबीसी मध्ये सुद्धा इस्लाम धर्माला मानणारे अनेक जाती उदाहरणार्थ आतर मण्यार धोबी बागवान जुलहा मंचुरी नदाफ अशा अनेक जाती आहेत परंतु ते सर्व इस्लाम धर्माला मानणाऱ्या आहेत तरी धर्माचा कॉलम असावा व त्यांच्या वेगवेगळ्या जातींचा उल्लेख त्यामध्ये असावा अशी आमच्या संघटनेची प्रमुख मागणी आहे जनगणनेच्या फॉर्ममध्ये सदर प्रकारचा उल्लेख व्हावा ही नम्र विनंती
मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अजित पठाण यांचे नेतृत्वात मुक्तार शेख माजीद पठाण सलीम खान बबलू शेख रफिक साबीर फैज शेख अखिल खान अमजद शेख श्याम गायकवाड इत्यादी कार्यकर्ते हजर होते पत्रकार वसीम पठाण नासिक
