रमिन काद्री/विभागीय संपादक-दक्ष पोलीस वार्ता,निफाड

सर्वांच्या आवडत्या ‘गणेशोत्सवा’चे आगमन काही दिवसांवरच येत आहे, त्या पार्श्वभूमीवर सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पप्पू कादरी यांनी जनतेला “एक गाव एक गणपती” ही संकल्पना अमलात आणण्याचे गणेश मंडळांना आवाहन केले आहे.
सायखेडा पोलीस स्टेशन मध्ये नुकताच त्यासंदर्भात शांतता कमिटीतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा सायखेडा पोलीस स्टेशनचे स.पो.नि. पप्पू कादरी यांनी जनतेला तसेच गणेश मंडळांना उद्देशून आपले मनोगत व्यक्त केले, त्याद्वारे त्यांनी एक गाव एक गणपती संकल्पना अमलात आणण्याचे ठरवले. गणेशोत्सव आनंदाने व शांततेत पार पाडावे तसेच वेगवेगळे शासकीय-सामाजिक उपक्रम राबविण्यात यावे, ध्वनीक्षेपाचा योग्य मर्यादित वापर करावा, पोलीस प्रशासन व गणेश मंडळ मंडळांमध्ये समन्वय ठेवावा, शासनाने दिलेले निर्देश पाळावे. जातीय व धार्मिक सलोखा कायम ठेवण्यात शासनाला मदत करावी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दोनच दिवसापूर्वी पवित्र श्रावण महिन्यात गायी कत्तलीसाठी नेताना सायखेड्याचे स.पो. नि. कादरी यांनी योग्य वेळेत कारवाई करून गाईंची सुटका करून त्यांनी समस्त बांधवांचे मन जिंकले त्याबद्दल सायखेड्याचे ग्रामस्थ आणि गणेश मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यानिमत्ताने सायखेडा पोलीस हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष-सदस्य तसेच महावितरणाचे विशाल मोरे, पोलीस पाटील जिल्हा उपाध्यक्ष अरुण बोडके, पोलीस पाटील तालुका अध्यक्ष रमेश आव्हाड, यासह सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांचे पोलीस पाटील तसेच समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

