सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,नाशिक

लाचलुचप्रत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. त्यात गुरुवारी (दि.२५) आदिवासी विकास आयुक्तालयात कारवाई करत, आदिवासी विकास विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांना तब्बल २८ लाख ८० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडुन ताब्यात घेण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, आदिवासी विकास विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असलेले दिनेशकुमार बागुल यांनी तक्रारदार ठेकेदाराकडून हरसूल येथील आश्रमशाळेच्या सेंट्रल किचनचे अडीच कोटी रुपयांचे काम मिळवून देवुन ते काम मंजूर करून देण्याच्या बदल्यात बिलाच्या १२ टक्के म्हणजेच तब्बल २८ लाख ८० हजार रुपयांची मागणी केली होती. मागील आठवड्यात शुक्रवारी (दि.१९) ही मागणी करण्यात आली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत विभागाने पडताळणी करून गुरुवारी (दि.२५) आदिवासी विकास आयुक्तालयात सापळा रचला. यावेळी लाच स्वीकारताना बागुल यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मागील वर्षभरातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी तब्बल २८ लाख ८० हजाराची रक्कम हस्तगत केल्यामुळे विभागाच्या धाडसी कारवाईबाबत कौतुक केले जात आहे.
अधिकाऱ्यांची कोट्यवधींची संपत्ती
दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अटक झालेले आदिवासी विकास विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांची शहरात तसेच जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांची संपत्ती असल्याची प्राथमिक माहिती आहे. आलिशान घर, गाड्या, जमिनी, गाळे, प्लॉट, फ्लॅट अशा अनेक स्वरूपात बागुल यांची संपत्ती असल्याची चर्चा आहे.
…. की अजून भागीदार ?
कामाच्या रकमेच्या तब्बल १२ टक्के म्हणजेच २८ लाख ८० हजार रुपयांची लाच म्हणजे फार मोठी रक्कम आहे. कार्यकारी अभियंता बागुल यांना याबाबत अटक झाली असली तरी या रकमेत अजून कोणी भागीदार होते का ? याबाबतही चौकशी होणे गरजेचे आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

