मेहुणेबारी पोलीस स्टेशन कडून वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करणारा आरोपी अटक करून मुध्येमाल जप्त केले दि तेरा १३/८/२४ रोजी फिर्यादी नामे राहुल विश्वास पाटील राहणार वहाळ ता चाळीसगाव जि जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार मेहुणेबारी पोलीस स्टेशन गुन्हा क्र२३५/२०२४ बी एन एस कलम 303 प्रमाणे अन्यात आरोपी विरुद्ध त्यांचे व इतर साक्षीदार यांचे वाहन्यांचा एकूण १० वेगवेगळ्या कंपनीच्या बॅटऱ्या चोरी गेल्या बाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याची सखोल तपासणी करून सदरचा गुन्हाचा उघडकीस आणून गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे बाबत मा पोलीस अधीक्षक सो डॉ श्री महेश्वर रेड्डी मा अप्पर पोलीस अधीक्षक सो श्रीमती कविता नेरकर मॅडम मा सहा पोलीस अधीक्षक श्री अभयसिंग देशमुख यांनी योग्य त्या मार्गदर्शनानुसार सूचना दिलेल्या होत्या नमूद गुन्ह्याच्या सखोल तपास करून गुन्ह्या तील आरोपींच्या शोध घेऊन चोरी गेलेला मुध्ये माल हस्तेगत करणे कामे प्रभारी अधिकारी प्रवीण दातरे सहा पोलीस निरीक्षक यांचे सूचनाप्रमाणे एक तपास पथक तयार करण्यात आले होते सदर पथकातील अधिकारी श्री सुहास आव्हाड पोलीस उपनिरीक्षक व स्टॉप पो हेड कॉ गोकुळ सोनवणे पो कॉ सचिन निकम पो कॉ निलेश लोहारे पो कॉ राकेश काळे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे हे सदर गुन्ह्याचा सखोल तपासणी करून यातील संशयित आरोपी नामे शेख शफीक शेख सलीम वय 38 रा नटराज थिएटर जवळ भाभा नगर धुळे यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्यातील अनुषंगाने सखोल तपास केला असता त्याने सदर गुन्हा त्याचे साथीदार नामे हमीद उर्फ नाट्या अन्सारी रा धुळे यांचे सह केल्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यातील चोरी केलेल्या विविध कंपन्यांचे १० बॅटऱ्या त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या तसेच त्याचे त्याने सदर गुन्हा करताना वापरलेली हुंडाई कंपनीची असेंट कार देखील सदर गुन्ह्याचे तपास कामी जप्त करण्यात आली आहे सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीं नामे हमीद उर्फ नाट्या याचा शोध घेतला असता तो फरार असल्याचा पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्याचा पोलीस शोध घेत आहे सदर आरोपी मिळून आल्यास परिसरातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नमूद गुन्ह्यातील अटक आरोपी हा अभिलेखा वरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर धुळे व परिसरातील चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याचा अधिक तपास मेहुणेबारी पोलीस स्टेशन करीत आहे परिसरातील नागरिकांना आव्हान करण्यात येते की नागरिकांनी आपापल्या गाड्या रोडच्या कडेला लावून ठेवणे ते सुरक्षित स्थळी पार्क करून योग्य ती खबरदारी घ्यावी जेणेकरून आपल्याला मालमत्तेची चोरी होऊन नुकसान होणार नाही
