दिनेश गोसावी / संपादक – दक्ष पोलीस वार्ता

निफाड तालुक्यातील सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड प्रकल्प बाधित संघर्ष समितीच्यावतीने शेतकऱ्यांनी आज माजी आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत निफाड प्रांत कार्यालयावर विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढला. जळगाव फाटा येथून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. शासकीय विश्रामगृहामार्गे प्रांत कार्यालयावर प्रकल्प बाधितांचा मोर्चा धडकला. शेतकरी एकजुटीचा विजय असो… प्रती एकरी दोन कोटी भरपाई द्यावी… चुकीचे निकाली काढलेले दावे रद्द करा… अशा घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या. प्रशासकिय इमारतीच्या प्रवेशद्वारावर निफाडच्या प्रांत अधिकारी हेमांगी पाटील मोर्चास सामोऱ्या गेल्या. मोर्चेकऱ्यांच्यावतीने माजी आमदार अनिल कदम व शेतकऱ्यांनी प्रांत हेमांगी पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यांनीही यावेळी सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांच्या भावना शासनदरबारी पोहचविण्याचे आश्वासन दिले. चांदोरी मा.सरपंच संदीप टरले, करंजगाव मा.सरपंच खंडू बोडके पाटील, दारणासांगवी सरपंच कांतीलाल (बाळू) बोडके, ॲड प्रकाश शिंदे, विनायक कांडेकर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या व्यथा प्रांत हेमांगी पाटील यांच्यासमोर मांडल्या. माजी आमदार अनिल कदम यांनी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना जाहिर केलेला मोबदला तूटपुंजा असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असून मागणीप्रमाणे प्रशासनाने सुधारणा करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या उद्रेक होइल, असा इशारा दिला. तसेच अनिल कदम यांनी प्रकल्पबाधित मोर्चेकरांच्या समक्ष महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व पालकमंत्री दादासाहेब भूसे यांच्याशी तत्काळ दूरध्वनीवरून संपर्क साधत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. त्याबाबत लवकरच मंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी अनिल कदम यांना दिले. मोर्चात शिवसेना तालुकाप्रमुख सुधिर कराड, बाजार समिती संचालक गोकुळ गिते, संदिप टरले, खंडू बोडके-पाटील, भगवान सानप, हिरालाल सानप, किरण सानप, बाळू बोडके, बापू सानप, अशोक शिंदे, रावसाहेब गोहाड, न्यानेश्वर खाडे, गोविंद शिंदे, एकनाथ शिंदे, महेश घोलप, विक्रम सानप, सोमनाथ वडघुले, परवेझ शेख, शिवाजी सानप, विश्वास सानप, विलास हांडगे, किरण पिंगळे, विनायक कांडेकर, रोशन शिंदे यांच्यासह चेहडी, वरेदारणा, लालपाडी, दारणासांगवी, चाटोरी, सावळी, निपाणी पिंपळगाव, तळवाडे, बेरवाडी शेतकरी उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

