हरीष शिंदे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पालघर

पालघरच्या जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात सायदे पैकी मारुतीची वाडी येथे जोडणारा हा मुख्य रस्ता आहे , वाकडपाडा ते सायदे जोडणारा हा मुख्य रस्ता आहे तसेच पर्यायी मार्ग म्हणून हा रस्ता खोडाळा बाजारपेठ तसेच खोडाळा नासिक मुख्य रस्ता पण याद्वारे जोडलेला आहे बरेचसे प्रवासी याच रस्त्यावरून दररोज प्रवास करत असतात परंतु सतत पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे या रस्यावर खूप मोठा खड्डा पडला आहे हा आणी या खड्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा धोक्यात येऊ शकतो हे नाकारता येणार नाही . तरी बांधकाम विभागाने या बाबीकडे वेळीच लक्ष देऊन खड्डा भरण्याचे काम पूर्ण करावे अशी स्थानिकांची मागणी आहे.

साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

