आनंद बंसल/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता

दि. 3/7/23 रोजी शांतीनगर, मखमलाबाद, नाशिक येथील एच.डी.एफ.सी बँकेचे एटीएम मशीन क्लासीक मोटार वॉशींग सेंटर, किशोर सुर्यवंशी मार्ग, म्हसरूळ, येथील एच.डी.एफ.सी बँकेचे ए.टी.एम मशीन मखमलाबाद,नाशिक येथील युनीयन बँकेचे ए.टी.एम मशीन या ठिकाणचे एटीएम मशीन फोडुन त्यातील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केले बाबत श्री. ऋशिकेश शरद आहेरराव, सुपरवायजर, ऍस्ट्रो सेक्युरिटी प्रा. लि. यांनी दिलेल्या तकारी वरून म्हसरूळ पोलीस ठाणे नाशिक शहर येथे गु.र.नं. 141/2023 भादवी कलम 380.511.427 प्रमाणे दिनांक 3/7/23 रोजी दाखल झाला होता. दि. 4/7/23 तसेच सदर गुन्हा घडतेवळी घटनास्थळी म्हसरूळ पोलीस स्टेशनची गाडी सायरन वाजवत तेथे आल्याने संशयीत आरोपी भेटेल त्या दिशने पळुन गेले. सदर आरोपीतांचा म्हसरूळ पोलीस पाठलाग करतांना अचानक त्यापैकी एक संशयीत आरोपी पोलीस गाडीला धडकला, त्याला लागलीच पोलीसांनी उपचाराकरीता शासकीय रुग्नालय नाशिक येथे दाखल केले असता त्याचा उपचारा प्रमाणे दाखल दरम्यान मृत्य झाला त्याबाबत म्हसरूळ पोलीस ठाणेस अकस्मात मृत्यु रजि. नं. 54 / 2023 सिआरपीसी करण्यात आला आहे. सदर दोन्ही नमुद घटनेसंबधीचा तपास मा. पोलीस आयुक्त सो यांनी गुन्हे शाखेकडे तात्काळ वर्ग केला. त्याप्रमाणे मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 01 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, इतर पोलीस अधिकारी व अंमलदार हे ए.टी.एम. चोरीचा प्रयत्न करून घटनास्थळावरून पळून जाणा-या संशयीत आरोपीतांची माहीती घेत असतांना मिळालेल्या तांत्रीक माहीतीच्या आधारे व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमी वरून गणेश नगर, मारुती मंदिरा शेजारी, तेजस अपार्टमेंन्ट म्हसरूळ, नाशिक या ठिकाणावरून संशयीत इसम नामे विरेंद्रकुमार फुलकरण चौधरी, वय – ३३ वर्ष सध्या राह. तेजस अपार्टमेंन्ट, म्हसरूळ, नाशिक मुळ राह- गाव- अहीरौला, पोस्ट| अमारेडिहा, तहसिल- भानपुर, जि. बस्ती, राज्य उत्तरप्रदेश धर्मेंद्र उर्फ राहुल रामनारायण पाल, वय – 33 वर्ष, सध्या राह. सदर मुळ राह- गाव- नरेंद्रपुर, तहसिल लंम्बुआ, जि. सुलतानपुर, राज्य उत्तरप्रदेश अमरकुमार रामदयाल चौधरी, वय – 28 वर्ष, सध्या राह. सदर मुळ राहगाव बाहरानपुर, तहसिल भानपुर, जि. बस्ती, राज्य उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेतले. सदर ताब्यात घेतलेल्या इसमांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार अनिल उर्फ धुपकरण चौधरी व प्रशांत उर्फ छोटु पाठक यांचेसोबत केल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्हयाचे तपासात आरोपी विरेंद्रकुमार फुलकरण चौधरी याचे कडुन गुन्हा करतांना वापरलेले दोन देशी बनावटीचे पिस्तोल, 04 राउन्ड व कोयता असे हस्तगत करण्यात आले आहे. तसेच तपासामध्ये सदर घटने मध्ये पोलीसांनी पाठलाग करतांना पोलीसांच्या गाडीला धडकुन गुन्हा करून पळून जाणारा जो इसम मयत झाला आहे त्याचे नाव वरील नमुद आरोपींचा साथीदार प्रशांत उर्फ छोटु रमेश पाठक असे असल्याचे निष्पन्न झाले. तर त्याचा मुख्य साथीदार अनिल चौधरी हा फरार झाला असुन त्याचा शोध घेवून त्यास अटक करीत आहोत. पुढील तपासात मयत प्रशांत उर्फ छोटु पाठक याचेवर विविध ठिकाणी गुन्हे असल्याचे माहीती मिळाली आहे व तो हल्ली मेरठ जेलमधुन सुटल्याची माहीती मिळाली आहे.सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), मा. सहा.पोलीस आयुक्त श्री. सिताराम कोल्हे सो, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. 01 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ सो, सपोनि/ हेमंत तोडकर, पोउनि / चेतन श्रीवंत, विष्णु उगले, सपोउनि / रविंद्र बागुल, पो. हवा. / प्रविण वाघमारे, नाझीम पठाण, शरद सोनवणे, प्रदिप म्हसदे, धनंजय शिंदे, पो.ना. / प्रशांत मरकड, विशाल देवरे, विशाल काठे, महेश साळुंके, राजेश राठोड, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, चालक पोअं./ समाधान पवार यांनी संयुक्त रित्या केलेली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :-98221 17037 / 98228 17037

