अरशद अन्सारी / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , जव्हार

जव्हार तालुक्यात भात कापणी, पूर्ण झाली तालुक्यातील शेतकरी भाजीपाला लागवड ते वालाच्या शेतीच्या लागवडीला मोठ्या प्रमाणात लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. लागवड करणाऱ्या भागात नांगरणी व तंत्रज्ञानाचाही वापर होत आहे.
थंडीत वातावरण चांगलं असल्याने भाज्यांचे भाव आता स्थिर राहणार असून पालेभाज्या देखील स्वस्त झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून गगनाला भिडणारे भाज्याचे दर गडगडले आहे यामुळे सर्वसामान्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे चाळीस रुपये मिळणारी मेथी चार रुपयावर आली आहे ग्रामीण भागात सहसा न दिसणारी ब्रोकली भाजीवाल्यांकडे दिसू लागली आहे याचबरोबर टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मटार, वांगी, गवार, भेंडी यासारखे पीक मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे परंतु इतर महागाई पाहता बळीराजा हवालदिल झाला आहे.
भाजीपाल्याला दैनंदिन आहारात विशेष महत्त्व
माणसाच्या दैनंदिन आहारामध्ये भाजीपाल्याला विशेष महत्त्व आहे. मानवी शरीराला प्रथिने करबोदके याचबरोबर जीवनसत्त्वे, खनिजे व तंतुमय पदार्थ यांचीही आवश्यकता असते. हे घटक भाजीपाल्याद्वारे पुरवले जाऊ शकतात.म्हणून जव्हार शहरात सकाळी ७ वाजेपासून ग्रामीण भागातून स्वच्छ आणि ताजा भाजीपाला दाखल होत भाजी मंडई मध्ये कोणतीही भाजी दहा रुपयांमध्ये अशी आवाज ऐकू येत आहे व अवघ्या ३ तासात भाजीपाला विक्री होत असल्याचे शेतकरी निर्मला ताई , यांनी सांगितले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

